मुंबईकरांचा लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप 

श्रद्धा पेडणेकर
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुंबई : गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पावर होणारी अत्यंत विलोभनीय पुष्पवृष्टी आणि नजर जाईल तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा जनसागर.. मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव तसच विविध चोपाट्यांवर आज दिवसभर असाच महौल दिसत होता. 

 सकाळपासून मंडळांमध्रये बाप्पाला निरोप देण्यासाठी लगबग सुरू झाली. मंडळांमध्ये बाप्पाची महाआरती करण्यात आली आणि गणरायाला निरोप देण्यासाठी सारेच सज्ज झाले.विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली.  

एका डोळ्यात हासू तर एका डोळ्यात आसू अशी भक्तांची स्थिती होती. विशेषतः लालबाग परळ परिसरात साडेआठनंतर मुंबईच्या विविध भागांमधून भक्तांचे जथ्येच्या जथ्ये दाखल होत होते.

बघता बघता, चौक, ब्रीज  सगळेच गणेश भक्तांनी फुलून गेले. वरदविनायकाची गेली बारा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर गणेशाला निरोपाचा क्षणी भक्त भावूक झाले असले तरीही वाजत -गाजत निरोप देण्याची प्रथेप्रमाणे प्रत्येकजण बाप्पाची मूर्ती डोळ्यात सामावून घेत होता.

सकाळी नऊच्या सुमारास लालबागमध्ये मुंबईच्या  राजाची अर्थात गणेश गल्लीच्या गणपतीची मिरवणूक निघाली आणि त्यानंतर तेजुकायाचा राजा तर चिंचपोकळीचा राजा,लालबागच्या राजांच्या स्वाऱ्या निघाल्या.

श्रॉफ बिल्डिंगमध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली पुष्पवृष्टी राजांवर करण्यात आली आणि हा सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी लालबागमध्ये भक्तांचा महासागर उसळला होता. केवळ लालबागच नव्हे तर दादर, परळ, चिंचपोकळीपासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत एकामागे एक मोठमोठ्या बाप्पांच्या मूर्तीसह भव्य मिरवणुका पाहायला मिळत होता.

दुपारनंतर घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरूवात झाली.आणि सकाळी आपापल्या मंडळांमधून निघालेल्या विनायकाला गिरगाव चौपाटीवर पोहोचण्यासाठी संध्याकाळ झाली. जुहु,दादर चौपाट्यांवर अशीच स्थिती होती.तर महापालिकेने उपलब्ध करून  दिलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठीही भक्तांची एकच गर्दी झाली होती. रात्री उशीरापर्यंत चौपाट्यांवर बाप्पांना निरोप दिला जात होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai News Marathi News Mumbai Ganesh Immersion Procession