गणेशोत्सव विशेष गाडीला रेल्वेचा अचानक ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) थिविमसाठी रात्री 8.50 वाजता सुटणारी गणपती विशेष गाडी शुक्रवारी अचानक रद्द झाली.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) थिविमसाठी रात्री 8.50 वाजता सुटणारी गणपती विशेष गाडी शुक्रवारी अचानक रद्द झाली. त्यामुळे स्थानकात गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडाला. 

केरळमधील तिरूअनंतपूरम स्थानकानजीक रुळावर मोठ्या प्रमाणात डोंगरावरील माती पडली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाने कोकण व दक्षिणेकडे जाणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आणि काही गाड्यांचे मार्ग बदलले. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईहून कोकणमार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या नेत्रावती, एलटीटी-एर्नाकुलम, भावनगर-कोचुवेली एलटीटी-कोचुवेली, पुणे-एर्नाकुलम, ओखा-एर्नाकुलम (वसई-विरारमार्ग) या गाड्या रद्द झाल्या आहेत.

सीएसएमटी-थिविम विशेष गाडीसाठी सायंकाळी 5 वाजता सीएसएमटीमध्ये येऊन रांगेत उभा राहिलो. मध्य रेल्वेने रात्री 7.30 वाजता ही गाडी रद्द करण्याची उद्‌घोषणा केली. त्यामुळे आमचा गोंधळ उडाला. 
- बळिराम गोवंडी, प्रवासी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav special train Sudden 'break' by railway