गोविंदा आला रे आला... आपल्या उत्साहाला ब्रेक मारा

प्रमाेद जाधव
Monday, 10 August 2020

गोपाळकालानिमित्त रायगड जिल्ह्यात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच गर्दी करण्यास बंदी आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेला कोरोनामुळे ब्रेक लागणार आहे. एकंदरीत गोपाळकालांच्या आनंदावर विरजन पडण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

अलिबाग : गोपाळकालानिमित्त रायगड जिल्ह्यात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच गर्दी करण्यास बंदी आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेला कोरोनामुळे ब्रेक लागणार आहे. एकंदरीत गोपाळकालांच्या आनंदावर विरजन पडण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

कृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला सणानिमित्त दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम शहरी व ग्रामीण भागांत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आठ हजारांहून अधिक सार्वजनिक व खासगी दहीहंड्या उभारल्या जातात. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. अबालवृद्धांपासून सर्वजण या कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होऊन हा सण जल्लोषात साजरा करतात. लाखो रुपयांची दहीहंडी उभारली जाते. कार्यक्रमाला रंगत आणण्यासाठी अभिनेते, अभिनेत्रींना आमंत्रण केले जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात.

गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात जाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची

सध्या रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे. तसेच दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहनही सरकारच्याने केले आहे. काही आयोजकांनी स्वतःहून पुढाकार घेत दहीहंडीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे या वर्षी हजारो दहीहंड्या फुटणार नसल्याने गोपाळकालांच्या आनंदात विरजन पडणार आहे. 

व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडलेे; सणासुदीच्या काळात ग्राहकांनी फिरवली पाठ

कडेकोट बंदोबस्त तैनात 
या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्डचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पाच स्ट्रायकिंग फोर्स असणार आहेत. त्यात अलिबाग, माणगाव, महाड, रोहा व नियंत्रण कक्षाच्या मार्गदर्शनाखाली हे दल काम पाहणार आहेत. जिल्ह्यात दोन अतिशिघ्र कृती दलाची नेमणूक केली जाणार असून, तीन आरसीपी प्लाटून आणि 255 होमगार्डचा समावेश असणार आहे. रायगड जिल्हा पोलिस दलाच्या अखत्यारितील 28 पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्त ठेवला जाणार आहे. 

गणेशभक्तांना दिलासा; बाप्पाची मूर्ती थेट येणार दारी

धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहीहंडीचा कार्यक्रम साध्या पद्धतीने घरी राहूनच साजरा करावा. प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे. 
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड 

सरकारच्या नियमाप्रमाणे गर्दीचे कार्यक्रम करण्यास बंदी घातली आहे. रुग्ण वाढत असल्याने काही मंडळांनी स्वतःहून पुढाकार घेत दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवणार आहोत. 
- अनिल पारसकर, पोलिस अधीक्षक, रायगड 

 

संपादन : उमा शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Dahihandi Festival in Raigad