माथेरानमधील पार्किंगमध्ये चोरी; वाहनाच्या सुरक्षेचा प्रश्र्न ऐरणीवर

अजय कदम
Tuesday, 20 October 2020

माथेरानमधील वन व्यवस्थापन समिती अंतर्गत असलेल्या वाहनतळाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. येथे उभ्या असलेल्या दुचाकीची बॅटरी चोरल्याची घटना दस्तुरी येथे घडली आहे. त्यामुळे वाहनतळाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

माथेरान : माथेरानमधील वन व्यवस्थापन समिती अंतर्गत असलेल्या वाहनतळाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. येथे उभ्या असलेल्या दुचाकीची बॅटरी चोरल्याची घटना दस्तुरी येथे घडली आहे. त्यामुळे वाहनतळाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

वन विभागाच्या जागेत वन व्यवस्थापन समिती माथेरान यांच्या अधिपत्याखाली हे वाहनतळ आहे. येथे पर्यटक तसेच स्थानिक यांच्या गाड्या उभ्या असतात. येणाऱ्या पर्यटकांच्या प्रत्येक गाडीचा कर घेतला जातो. मात्र, सुरक्षितता कोणतीही दिली जात नाही. येथे राहणाऱ्या प्रशांत गायकवाड व प्रवीण गायकवाड यांची दुचाकी वाहनतळात उभी होती. दुसऱ्या दिवशी दुचाकीची बॅटरी चोरीला गेल्याचे प्रशांत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तेथील करवसुली विभागात याबाबत विचारणा केली; मात्र कोणीही उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांनी माथेरान पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. 

हेही वाचा : रायगडमधील बेकायदा मद्यविक्रीचे नव्या पोलिस अधीक्षकांसमोर आव्हान; कोट्यवधीची उलाढाल असल्याची शक्यता 

पार्किंग अजूनही असुरक्षित 
वन व्यवस्थापन समितीकडून येणाऱ्या प्रत्येक गाडीचे पार्किंग भाडे कर स्वरूपात घेतले जाते. मात्र, त्या गाड्यांच्या सुरक्षेविषयी कोणतीही काळजी घेताना वन व्यवस्थापन समिती व वन विभाग घेताना दिसत नाही. येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीच्या मागे घोडेवाले, हातरिक्षावाले, कुली व हॉटेल, लॉजिंगचे दलाल धावत असतात. कितीतरी अपरिचित चेहरे या पार्किंगमध्ये फिरत असतात; मात्र पोलिस अथवा पार्किंगचे कर्मचारी त्यांची चौकशी करत नाहीत. 

मोठी बातमी : इंडिनेशियन तरुणीने पुणेकर मित्राला गंडवले; खोट्या लोकशनद्वारे मित्राची फसवणूक 

माथेरानमधील स्थानिकांच्या दुचाकीची बॅटरी चोरीला गेली, हे आमच्या कर्मचाऱ्यामार्फत समजले. यापुढे आम्ही रात्रीच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहोत. तसेच त्या कर्मचाऱ्यांना पार्किंगमध्ये फिरते ठेऊन सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार आहोत. 
- योगेश जाधव, वन व्यवस्थापन समिती, अध्यक्ष 

आमच्या वाहनतळातून आतापर्यंत असा प्रकार घडला नाही. एकाच दुचाकीचे तीन वेळा बॅटरी चोरली जाते. बाकीच्या दुचाकी सुरक्षित असतात. त्यामुळे हे न समजण्यापलिकडचे आहे. यासाठी दुचाकींवर आमची करडी नजर असणार आहे. 
- राहुल बिरामणे, व्यवस्थापक 

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft in Matheran Parking area