esakal | तेंडुलकर पुन्हा दिसणार मैदानात; यंदाच्या IPL हंगामात मुंबई इंडियन्सच लावणार बोली?
sakal

बोलून बातमी शोधा

तेंडुलकर पुन्हा दिसणार मैदानात; यंदाच्या IPL हंगामात मुंबई इंडियन्सच लावणार बोली?

यंदाच्या IPL या लिलावात ८१३ भारतीय आणि 283 परदेशी खेळाडू म्हणजे एकूण १०९७ खेळाडूंना नामांकन देण्यात आलं आहे. 

तेंडुलकर पुन्हा दिसणार मैदानात; यंदाच्या IPL हंगामात मुंबई इंडियन्सच लावणार बोली?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई: क्रिकेटप्रेमींसाठी आणि मुख्यत्वे मुंबईकरांसाठी क्रिकेट जगतातून आनंदाची बातमी समोर येतेय. कारण आपल्या सर्वांना तेंडुलकर पुन्हा एकदा IPL च्या मैदानात खेळताना दिसण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र आता मैदानात उतरणारा तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर नसून अर्जुन तेंडुलकर असणार आहे.  

यंदा होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात सचिन तेंडुलकरचा सुपुत्र, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जून तेंडुलकरचा देखील समावेश करण्यात आलाय. अर्जुन तेंंडुलकर यंदाच्या IPL लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे अर्जुनची लिलावासाठी ची बेस प्राईझ 20 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलीय. 18 फेब्रुवारीला यंदाच्या आयपीएलसाठीची मिनी लिलाव प्रक्रिया चेन्नईमध्ये पार पडणार  आहे. यामध्ये अर्जुन तेंडुलकरवर देखील बोली लावली जाईल. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात घेण्यासाठी कोण उत्सुकता दाखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. युएईत रंगलेल्या आयपीएलच्या हंगामात तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यासोबत दिसला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा त्याच्यावर बोली लावणार, असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

यंदाच्या IPL या लिलावात ८१३ भारतीय आणि 283 परदेशी खेळाडू म्हणजे एकूण १०९७ खेळाडूंना नामांकन देण्यात आलं आहे. 

हेही वाचा : कॅपिटॉल हिल आणि लाल किल्याचा संबध जोडणे चुकीचे, परराष्ट्र खात्याच्या कृतीमुळे शेतकरी आंदोलन जगभरात पोहोचले 

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीच्या माध्यमातून क्रिकेटमधील आपल्या करिअरचा डेब्यू केलाय. या सामन्यात अर्जुनने हरियाणाविरुद्धच्या सामन्यात 34 धावा खर्च करुन 1 विकेट घेण्याची कामगिरी बजावलीय. त्यानंतर अर्जुनने पुद्दुचेरी विरुद्धच्या सामन्यात 33 धावा खर्च करुन 1 विकेट घेतली होती.   

यंदाच्या हंगामातील लिलावासाठी एकूण 1097 खेळाडू असणार आहेत. ज्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांत याचाही समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली सामन्यांमध्ये श्रीशांतने चांगली कामगिरी बजावली होती. श्रीशांची बेस प्राईझ 75 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 

हरभजन सिंह, केदार जाधव, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, सॅम बिलिंग्स, जेसन रॉय, मार्क वूड, लियम प्लंकेट आणि कॉलिन इंग्राम यांची बेस प्राईझ ही 2 कोटी रुपये असणार आहे. तर हनुमा विहारी 1 कोटी, चेतेश्वर पुजारा 50 लाख या खेळाडूंनी देखील यंदाच्या IPL हंगामात लिलावासाठी नामांकने पटकावली आहेत.        

हेही वाचा :  'ड' जीवनसत्व शरीरासाठी का आहे महत्त्वाचं? 'एका अहवालातून आली महत्त्वाची माहिती समोर

मात्र महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या IPL मध्ये 283 परदेशी खेळाडूंपैकी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्स संघातील जेम्स पॅटीसन याने IPL खेळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 

son of sachin tendulkar arjun tendulkar registers for IPL 2021 auction यंदाच्या IPL