esakal | पत्नीचा गर्भपात, डिप्रेशनमुळे घेत होती गोळ्या; NCB कडून अटकेनंतर एजाजची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

ajaz khan

आठ तासांच्या चौकशीनंतर एजाज खानला एनसीबीकडून अटक

पत्नीचा गर्भपात, डिप्रेशनमुळे घेत होती गोळ्या; NCB कडून अटकेनंतर एजाजची प्रतिक्रिया

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ड्रग्ज प्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता एजाज खानला मंगळवारी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं. एजाज राजस्थानहून मुंबईला परतत असताना एनसीबीने ही कारवाई केली. आठ तास त्याची चौकशी केल्यानंतर एनसीबीने एजाजला अटक केली आहे. एनसीबीची टीम एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला इथल्या घरांवर छापेमारीची कारवाई करत आहे. याआधी एनसीबीने ड्रग्जची तस्करी करणाऱ्या शादाब बटाटाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्याच्या चौकशीदरम्यान एजाजचं नाव समोर आलं. ड्रग्ज प्रकरणी एजाजचं नाव याआधीही समोर आलं होतं. 

एजाजचं स्पष्टीकरण
"माझ्या घरात चार झोपेच्या गोळ्या आढळल्या आहेत. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला होता आणि झोपेच्या गोळ्या ती नैराश्यावर मात करण्यासाठी घेत आहे", असं स्पष्टीकरण एजाजने दिलं. 

आठ तासांची सखोल चौकशी
ड्रग पेडलर शादाब बटाटाने चौकशीदरम्यान एजाजचा उल्लेख केला. त्यावरून एनसीबीने एजाजला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने अटकेची कारवाई केली. आता एनसीबी एजाजच्या कस्टडीची मागणी करू शकते. त्यामुळे कोर्टात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

२०१८ मध्येही केली होती अटक
२०१८ मध्ये एजाजला नवी मुंबईच्या अँटी-नार्कोटिक्स सेलने मुंबईच्या एका हॉटेलमधून अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे आठ अमलीपदार्थाच्या गोळ्या आढळल्या होत्या. बंदी असलेल्या अंमलीपदार्थांचा साठा आढळल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. 

हेही वाचा : प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; दोन दिवसांत येणारं होतं नवीन गाणं

फेसबुक पोस्टमुळेही होता चर्चेत
एजाज खान याआधी फेसबुकवर एक वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे चर्चेत होता. त्या व्हिडीओप्रकरणी एजाजला अटकसुद्धा करण्यात आली होती. एजाजने 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. 
 

loading image