निर्माते-दिग्दर्शक अर्जुन हिंगोराणी यांचे निधन 

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

मुंबई - अभिनेते धर्मेंद्र यांना चित्रपटात पहिली संधी देणारे निर्माते-दिग्दर्शक अर्जुन हिंगोराणी (वय 92) यांचे शनिवारी उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मुंबई - अभिनेते धर्मेंद्र यांना चित्रपटात पहिली संधी देणारे निर्माते-दिग्दर्शक अर्जुन हिंगोराणी (वय 92) यांचे शनिवारी उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतामधील जैकोबाबादमध्ये जन्मलेले हिंगोराणी 1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुंबईत आले. वकिलीचे शिक्षण घेतले असले, तरी चित्रपटांच्या आवडीमुळे ते या क्षेत्रात आले. 1960 ते 1990 या कालावधीत त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी 1960मध्ये धर्मेंद्र यांना "दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून ब्रेक दिला. त्यानंतरही दोघांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले. "अब्बास' हा सिंधी भाषेतील पहिला चित्रपट बनवण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या नावांची सुरवात "क'ने होत असे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांमध्ये "कब क्‍यों और कहॉं', "कहानी किस्मत की', "कातिलों के कातिल', "कुदरत का करिश्‍मा', "खेल खिलाडी का', "सल्तनत' आदींचा समावेश आहे. हिंगोराणी यांनी "हाऊ टू बी हॅप्पी अँड रियलाइज युवर ड्रीम्स' नावाचे पुस्तकही लिहिले होते. हिंगोराणी यांच्या मृत्यूबद्दल धर्मेंद्र यांनी शोक व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Producer-director Arjun Hingorani passes away