मुंबई - मराठा समाज आरक्षणासाठी संतप्त झाला असताना आता राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही हा रोष समोर येऊ लागला आहे. मराठा आरक्षण, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव म्हणून सर्व काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा आग्रह सोमवारी धरला. आरक्षणाबाबतीत पक्षाची भूमिका समाजासोबत असायला हवी. सरकार आंदोलनाला अद्याप गंभीरपणे घेत नसल्याने संताप वाढत आहे. पाच मराठा आंदोलकांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्व आमदारांना राजीनामा देण्यास परवानगी द्या, अशी मागणी आमदारांनी केली.