#MarathaKrantiMorcha राणेंना जवळ केल्याचा शिवसेनेला राग 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 July 2018

मुंबई - मराठा समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नारायण राणे यांची मदत घेतल्याने शिवसेना नाराज झाली आहे. आज बैठकीत मराठा आंदोलन हा शिवसेना-भाजप सरकारविरोधात काही बड्या नेत्यांनी रचलेला कट असल्याचा आरोप आमदारांनी केला, पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना नारायण राणे यांना मोठे केल्याचा आक्षेपही नोंदवला. मराठा आंदोलकांशी शांतता प्रस्तावाची चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, रामदास कदम यांना समवेत का घेत नाहीत, असा प्रश्‍नही आमदारांनी केला.

मुंबई - मराठा समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नारायण राणे यांची मदत घेतल्याने शिवसेना नाराज झाली आहे. आज बैठकीत मराठा आंदोलन हा शिवसेना-भाजप सरकारविरोधात काही बड्या नेत्यांनी रचलेला कट असल्याचा आरोप आमदारांनी केला, पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना नारायण राणे यांना मोठे केल्याचा आक्षेपही नोंदवला. मराठा आंदोलकांशी शांतता प्रस्तावाची चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, रामदास कदम यांना समवेत का घेत नाहीत, असा प्रश्‍नही आमदारांनी केला. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेने या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देणे आवश्‍यक असले तरी त्यामागची भावना वेगळी असल्याचा संशय व्यक्‍त केला. सुमारे १५ ते २० आमदारांनी फडणवीस यांना पायउतार करण्याची पार्श्‍वभूमी तयार करणे, हा या आंदोलनामागचा उद्देश असल्याची भावना व्यक्‍त केल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha kranti morcha Shivsena angery with bjp