#MarathaKrantiMorcha आरक्षण आंदोलनाची सुरवात माझ्यापासून - मेटे

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 7 August 2018

मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची सुरवात आपल्यापासून झाल्याचा दावा आमदार विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ""गेल्या 30 वर्षांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारबरोबर संघर्ष करत असून, आरक्षणाचे नाव घेण्यासही समाजातली लोक धाडस दाखवत नव्हते, तेव्हा मतांचा विचार न करता मराठा समाजाच्या बाजूने उघडपणे उभा होतो,'' असाही दावा त्यांनी सोमवारी केला.

आरक्षणाच्या मागणीसाठी होत असणाऱ्या आत्महत्यांचे सत्र थांबावे यासाठी मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी केलेल्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. त्याबाबत त्यांनी आज माहिती दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून यापुढे मराठा समाजासाठीच आर्थिक मदत केली जाणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. यामध्ये महामंडळाच्या नावातून "आर्थिक मागास' हे शब्द वगळण्यात येतील; तसेच केवळ मराठा समाजातील तरुणांनाच या महामंडळाकडून कर्ज मिळेल, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. मराठा तरुणांना उद्योग उभारणीसाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या बरोबर शेड्युल बॅंक, सक्षम सहकारी बॅंक आणि अर्बन बॅंकेतून कर्ज देण्याची सुविधा उभारण्यात येणार असून, त्याबाबतचा अध्यादेश लवकरच काढला जाणार असल्याचेही मेटे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha Marata Reservation Agitation Vinayak Mete