छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार प्रकाश आबीटकर यांचे उद्या आत्मक्लेश आंदोलन

सिद्धेश्वर डुकरे
Wednesday, 8 August 2018

​आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून आमदार आबिटकर हे माराठा समाजाच्या आंदोलनास पाठींबा देणार आहेत. या आत्मक्लेश आंदोलनास परवानगी मिळावी यासाठी मागणीचे पत्र आबिटकर यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाठवले आहे.

मुंबई : राज्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (ता. 9) राज्यभर आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास सक्रिय सहभाग आणि पाठींबा देण्यासाठी  कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर 'आत्मक्लेश' आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून आमदार आबिटकर हे माराठा समाजाच्या आंदोलनास पाठींबा देणार आहेत. या आत्मक्लेश आंदोलनास परवानगी मिळावी यासाठी मागणीचे पत्र आबिटकर यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाठवले आहे. तसेच विधीमंडळाच्या सचिवालयाची देखील आबिटकर यांनी पत्र देऊन परवानगी मागितली आहे. ते उद्या सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आत्मक्लेश आंदोलनास बसणार आहेत. विधानसभा अध्यक्षास पाठवलेल्या पत्रात आबिटकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे. याकडे लक्ष वेधले आहे.

मराठा समाजाच्या वतीने मागील वर्षभरापासून शांततेत सुमारे 57 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतरही सरकारने म्हणावी तशी दखल घेतली नसल्याचे चित्र निर्माण झाल्यावर मराठा समाजने पुन्हा आक्रमक मोर्चे काढले आहेत. याला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट लागले आहे. तर आरक्षण तातडीने मिळाले पाहीजे यासाठी मराठा समाजातील सहा-सात जणांचा आतपर्यत बळी गेला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha MLA prakash aabitkar agitation in front of Chatrapati Shivaji Maharaj statue