पुणे-मु्ंबई रेल्वे वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी; सेवा पूर्ववत होणार?

trains on pune-mumbai train may run from 15 of january
trains on pune-mumbai train may run from 15 of january

पिंपरी : मुंबई-पुणे लोहमार्गावरील मंकीहिल ते नागनाथपर्यंच्या तिसऱ्या मार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे यामार्गावरून लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्याची शक्‍यता आहे. लोहमार्गाचे काम सुरू असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून धावणाऱ्या सहा गाड्या सध्या पुण्यावरून धावत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

15 जानेवारीपर्यंत काम चालणार
पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे या भागाची दुरुस्ती करण्यासाठी बंद ठेवण्यात आला होता. मंकीहिल ते नागनाथदरम्यान असणाऱ्या लोहमार्गावरील रूळ उखडण्याबरोबरच मातीचा बंधारा वाहून गेला होता. त्याचा परिणाम मुंबईहून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणारा मार्ग बंद झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या काही गाड्या अल्पकाळासाठी बंद ठेवल्या होत्या. तर काही गाड्यांची वाहतूक ही पुण्यातून सुरू आहे. यंदा ऑक्‍टोबर अखेरपर्यंत पावसाचा जोर होता. त्यामुळे दुरुस्तीचे काम सहा नोव्हेंबर रोजी सुरू झाले. त्यावेळी हे काम पंधरा जानेवारी 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, रेल्वेच्या अभियंत्यांनी हे काम वेळेअगोदरच पूर्ण केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या मार्गाची चाचणी करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतुकीला सुरुवात होणार आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

सहाच गाड्या धावतात!
पुण्यावरून सध्या पंढरपूर ते मुंबई पॅसेंजर, हुबळी ते एलटीटी एक्‍स्प्रेस, कोल्हापूर ते मुंबईदरम्यान धावणारी सह्याद्री आणि कोयना एक्‍स्प्रेस, हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्‍स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते विशाखापट्‌टणम आणि नांदेड-पनवेल एक्‍स्प्रेस या गाड्या सध्या पुण्यावरून धावत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com