रिक्षाही बुक करा मोबाईल ऍपवर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई - लोकलमधून उतरल्यानंतर रिक्षा शोधणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षा मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन बुक करता येणार आहे. हा पर्याय "ट्रेनमॅन‘ या ऍप्लिकेशनमुळे मिळाला आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांची मुजोरी कमी होईल अशी अपेक्षा आहे.

ट्रेनमॅनने देशातील 35 शहरांत या ऍपवरून रिक्षाचालकांना जोडून घेतले आहे. रेल्वेशी आधारीत माहितीवर या ऍपला "जुगनू‘ या सेवा पुरवठादाराने (एग्रेगेटर) माहिती पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. रेल्वेस्थानकाच्या ठराविक परिसरातील रिक्षांचे ट्रॅकिंग होऊन प्रवाशांना रिक्षाचा पर्याय निवडता येईल. महत्त्वाचे म्हणजे रिक्षा किती वेळात येईल, हेसुद्धा मोबाईल ऍपवर दिसेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobile appfor autorickshaw booking in mumbai