होणाऱ्या नवरदेवाला घडली अद्दल! हुंड्यात तब्बल 25 तोळे सोने, 15 लाखांची केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

नेरळ गावात एका तरुणीचा साखरपुडा झाल्यानंतर नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीच्या वडिलांकडून 15 लाख रुपये आणि 25 तोळे सोन्याची मागणी केली. ही मागणी त्यांनी पूर्ण न केल्यास मुलीची बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या नवऱ्यामुलासह पाच जणांविरोधात नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

नेरळ : नेरळ गावात एका तरुणीचा साखरपुडा झाल्यानंतर नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीच्या वडिलांकडून 15 लाख रुपये आणि 25 तोळे सोन्याची मागणी केली. ही मागणी त्यांनी पूर्ण न केल्यास मुलीची बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या नवऱ्यामुलासह पाच जणांविरोधात नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
नेरळ गावातील राजेंद्र गुरुनगर भागातील एका तरुणीचे लग्न कल्याण येथील श्रीकांत प्रल्हाद राठोड या तरुणाबरोबर ठरला होता. त्यांचा साखरपुडा 15 मार्च रोजी झाला, तर लग्न मे मध्ये होणार होते.

 महत्त्वाची बातमी निसर्ग चक्रीवादळामुळे पालिकेचे जागते रहो! विभागीय कार्यालयांना सतर्क राहण्याचे आदेश  

तत्पूर्वी मुलीच्या वडिलांनी मुलीचा संसार चांगला व्हावा, यासाठी दोन लाख एक हजाराची रक्कम हुंडा म्हणून स्त्रीधन या नावाखाली मुलाच्या कुटुंबीयांना दिली. मात्र, साखरपुडा झाल्यानंतर मुलाकडील नातेवाईकांनी 25 तोळे सोने आणि 15 लाख रुपये हुंडा देण्याची मागणी केली. त्या वेळी आपण एवढे पैसे देऊ शकत नाही, अशी भूमिका मुलीच्या वडिलांनी घेतली. यामुळे श्रीकांत याच्यासह त्याचे आई-वडील तसेच अन्य दोघांनी मुलीच्या घरी येऊन साखरपुडा आणि लग्नासाठी बुक केलेल्या हॉल आणि अन्य तयारीसाठी आलेला 8 लाख 10 हजार 658 रुपयांच्या खर्चाची मागणी केली.

हेही वाचा ः पालघरसह डहाणूत 'निसर्ग' वादळाचे संकट; प्रशासनासह 'एनडीआरएफ' सतर्क

मात्र, कोणतीही मागणी पूर्ण होत नसल्याने तरुणीची बदनामी व्हावी या उद्देशाने श्रीकांतसह प्रल्हाद राठोड, आशा राठोड, सरला राठोड, आर. जी. राठोड यांनी लग्न मोडून टाकण्याची धमकी दिली. एवढ्यावर न थांबता त्यांनी दमदाटी आणि शिवीगाळही केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी फसवणूक केल्याबद्दल नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
नेरळ पोलिसांनी लग्नाआधी हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गुन्हा हुंडा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक तात्या पोसई सावंजी हे करत आहेत. 

  harrassed for dowry in Naral


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  harrassed for dowry in Naral