गणेशोत्सवासाठी 11 डब्यांची एसी डबल डेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मुंबई : गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी कोकणवासी मोठी गर्दी करतात. खास या चाकरमान्यांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबल डेकर एक्‍स्प्रेसला 11 डब्यांची करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या एक्‍स्प्रेसला तृतीय श्रेणी एसीचे 3 जादा डबेदेखील जोडले जाणार आहेत.

मुंबई : गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी कोकणवासी मोठी गर्दी करतात. खास या चाकरमान्यांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबल डेकर एक्‍स्प्रेसला 11 डब्यांची करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या एक्‍स्प्रेसला तृतीय श्रेणी एसीचे 3 जादा डबेदेखील जोडले जाणार आहेत.

गणेशोत्सव काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबल डेकर एक्‍स्प्रेस 8 डब्याऐवजी 11 डब्यांची केली जाणार आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर (11085) एक्‍स्प्रेस ही 12 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी व बुधवारी आणि गाडी क्रमांक 11086 ही 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी व गुरुवारी 11 डब्यांची केली जाईल; तर लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर (11099) एक्‍स्प्रेसला 10 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी आणि गाडी क्रमांक 11100 ला 11 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी 11 डब्यांची केली जाणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी विशेष मेल एक्‍स्प्रेस.

- पावसामुळे मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरील मेल, एक्‍स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीकरिता मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी चार आणि सावंतवाडी ते पनवेल चार अशा विशेष मेल एक्‍स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी मेल एक्‍स्प्रेस ही 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट रोजी चालविण्यात येईल. ही मेल एक्‍स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री 9.15 वाजता सुटेल. तर सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस मेल एक्‍स्प्रेस 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट रोजी चालविण्यात येईल. ही मेल एक्‍स्प्रेस सावंतवाडीहून सकाळी 10 वाजता सुटेल. या मेल एक्‍स्प्रेसला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकावर थांबा दिला जाईल; तर पनवेल ते सावंतवाडी मेल एक्‍स्प्रेस 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट रोजी चालविण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: गणेशोत्सव काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबल डेकर एक्‍स्प्रेस 8 डब्याऐवजी 11 डब्यांची केली जाणार आहे.