कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ ऑनलाईन मैफल 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 28 May 2020

‘कोविड -19’ महामारीच्या परिस्थितीत कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ या ऑनलाईन संगीत मैफलीचे आयोजन केले आहे.

मुंबई : ‘कोविड -19’ महामारीच्या परिस्थितीत कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ या ऑनलाईन संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. ‘कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन’ ,  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी एकत्रित येऊन जागतिक तंबाखूरहित सप्ताहाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला आहे.  7 जून  रोजी सायंकाळी 8 वाजता ही मैफल होणार आहे. या मैफलीत शान, कुणाल गांजावाला, सलीम सुलेमान, नेहा भसीन या गायकांचा समावेश आहे. 

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यक्रमातून जो निधी जमा होणार आहे तो ‘कोविड-19’ लॉकडाउनच्या काळात जे कर्करोग रुग्ण त्यांच्या उपचारांसाठी मुंबईत आले पण येथेच अडकून पडले अशा गरीब रुग्णांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. ‘कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन’ (सीपीएए) त्यांना महिनाभर लागणारे अन्नधान्य पुरवीत असून त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या निवारा सोयींबद्दलची माहिती देते आणि त्यांन स्वच्छता उपकरणे पुरविते. त्यांमध्ये मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टींचा समावेश असतो.

तीन माणसं बोलली की रडली..? महाविकास आघाडीवर भाजपचा पलटवार
 

या कार्यक्रमात प्रख्यात गायक शान, कुणाल गांजावाला, सलीम मर्चंट, बेनी दयाळ, शादाब फारिदी, नेहा भसीन, ध्वनी भानुशाली, जोनिता गांधी, शिल्पा राव, अदिती सिंग, भूमी त्रिवेदी, आकृती कक्कर, अनुषा मणी, ममता शर्मा आणि रसिका आदी सहभागी होणार आहेत. त्याशिवाय इतर मान्यवरसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असेल. ‘टीकटॉक इंडिया’च्या अधिकृत हँडलवरून या संगीत मैफलीचे थेट प्रक्षेपण होणार आहे.‘प्रोटेक्टींग युथ फ्रोम इंडस्ट्री मॅनीप्युलेशन अँड प्रीव्हेटिंग देम फ्रॉम टोबॅको अँड निकोटीन युज’ हे यंदाच्या ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन 2020’ची संकल्पना आहे. ‘सीपीएए’ने ‘क्विट टोबॅको इंडिया’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ‘Yes to Life ... No to Tobacco’ online concert to help cancer patients