तीन माणसं बोलली की रडली..? महाविकास आघाडीवर भाजपचा पलटवार

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 28 मे 2020

आघाडीची “तीन माणसं” बोलली की रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका, अशा शब्दां आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीनं केलेल्या आरोपांवर पलटवार केला. 

मुंबई- मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकरानं राज्याला किती पैशांची मदत केली याबाबतची सविस्तर मांडणी केली. त्यावर बुधवारी भाजपनं केलेल्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली. महाविकासआघाडीच्या या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब आणि काँग्रेसकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. अनिल परब यांनी फडणवीसांच्या आकडेवारीची पोलखोल केली. महाविकास आघाडीच्या टीकेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. आशिष शेलार यांनी सलग आठ ट्विटकरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. 

ट्विटमध्ये काय म्हणाले आशिष शेलार 

आघाडीची “तीन माणसं” बोलली की रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका, अशा शब्दां आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीनं केलेल्या आरोपांवर पलटवार केला. 

 

विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली.एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला “आघाडीची तीन माणसं” धावली.घाबरताय कशाला?तुमचं अपयश,नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको, असंही त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलंय. 

एका ट्विटमध्ये त्यांनी जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. शेलार यांनी लिहिलं की, तथाकथित अर्थतज्ज्ञ जयंत पाटील हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले…पण किती रडणार? खोटं किती बोलणार?अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडंवा ना..कुणी रोखलंय तुम्हाला..उगाच पावटे खाल्या सारखे का वागताय?दुर्गंधी का सोडताय? “त्यांना”जमत नसेल “तुम्ही” करुन दाखवा. 

 

त्यानंतर अनिल परब यांना भाजपनं केलेला हा आभास नसून सत्य असल्याचं म्हटलं. गेली 20 वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार देत आहात.. अनिल परब हा आभास नाही सत्य! आभासी रडू नका, या सत्यावर बोला! मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत?त्याचं उत्तर द्या!, असा सवालही त्यांनी अनिल परब यांना विचारला आहे. 

मुख्यमंत्री कुठे आहेत, शेलारांचा सवाल 

बुधवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली झाली. त्यानंतर झालेल्या परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते यावरुनही शेलारांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे.आघाडीची तीन माणसं" बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत.. खाटा नाहीत, डाँक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत.. त्याचे काय ते सांगा.. सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

काँग्रेसवर टीका 

या पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी आमचं सरकार योग्य उपाययोजना करत असल्याचं नमूद केलं. त्यावरुनही शेलारांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली. पळकुटी भूमिका आज पण दिसली. काँग्रेस पळुन दाखवतेय... किमान बाकीच्यांनी रडून नको करून दाखवा, असं म्हणत आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three people spoke or cried ..? BJP's counterattack on Mahavikas aghadi