राज्यात 1 कोटी कोरोना चाचण्या पूर्ण; पॉझिटिव्ह निदानाचे प्रमाण 17 टक्के

मिलिंद तांबे
Saturday, 21 November 2020

राज्यात आजपर्यंत  1,00,35,665 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 17,68,695 ( 17.62 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई : राज्यात आजपर्यंत  1,00,35,665 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 17,68,695 ( 17.62 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,58,090 लोकं होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,883 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा - रायगड जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू; निर्णयाची सक्ती नाही

आज राज्यात 5,640 रूग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 17,68,695 इतकी झाली आहे. आज राज्यात 155 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 2.63 इतका झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण 78,272 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

राज्यात आज दिवसभरात 6,945 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 16,42,916 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर 92.89 टक्के इतका आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढली असून ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे.   

हेही वाचा - टीआरपी गेरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) गुन्हा दाखल

आज राज्यात दिवसभरात 155 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 46,511 वर पोहोचला आहे. मृत्यूंमध्ये ठाणे परिमंडळ 27, पुणे 75,नाशिक 10, कोल्हापूर 4,औरंगाबाद 10, लातूर मंडळ 7,अकोला मंडळ 3,नागपूर 18 व इतर राज्य 1 येथील मृत्यूंचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 % एवढा आहे.

1 crore corona tests completed in the state The positive diagnosis rate is 17 percent 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 crore corona tests completed in the state The positive diagnosis rate is 17 percent