मुंबईत 10 लसीकरण केंद्रांवर 1 हजार 597 हेल्थकेअर वर्कर्संना टोचली लस

भाग्यश्री भुवड
Wednesday, 20 January 2021

पालिकेचे 9 लसीकरण केंद्र आणि राज्य सरकारचे जे. जे. 1 अशा 10 लसीकरण केंद्रावर मंगळवारी दिवसभरात 1,597 हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचण्यात आली.

मुंबई: कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध झाली आणि शनिवारपासून लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पालिकेने 9 लसीकरण केंद्रांवर 40 बुथ तयार केले होते. पालिकेचे 9 लसीकरण केंद्र आणि राज्य सरकारचे जे. जे. 1 अशा 10 लसीकरण केंद्रावर मंगळवारी दिवसभरात 1,597 हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचण्यात आली. दरम्यान, रोज 4 हजार हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचण्याचे टार्गेट दुसऱ्या वेळेसही फोल ठरले आहे. 

केंद्रनिहाय लसीकरण 

मंगळवारी पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सर्व केद्रांवर लसीकरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात 307, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात 110, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 165, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात 229, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात 90, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात 59, घाटकोपर राजावाडी रुग्णालयात 285, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 236 आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात 103 तर जेजे रुग्णालयात 13 जणांना लस देण्यात आली होती. मंगळवारी दिवसभरात एकूण 1,597 हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचण्यात आली. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
800 हेल्थकेअर वर्कर्सचे दोन वेळा नाव

काल लसीकरण मोहीमेच्या फेरीत 800 हेल्थकेअर वर्कर्संची कोविन अॅपमध्ये दोन वेळा नोंद झाल्याचे समोर आले. त्यामुळे कोविन अॅप पुन्हा एकदा फोल ठरल्याचे दिसून आले. 
 
नायर रुग्णालयात तीन जणांना त्रास

कोरोनावर उपयुक्त लस घेतल्यानंतर आधी व्ही. एन. देसाई रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात दोन हेल्थकेअर वर्कर्सना सौम्य त्रास झाल्याचे समोर आले. तर काल नायर रुग्णालयात 165 हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचल्यानंतर तीन जणांना त्रास झाल्याचे समोर आले आहे. या तिघांना रुग्णालयात दाखल केले असून देखरेख ठेवण्यात येत असल्याचे प्रकृती स्थिर असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

हेही वाचा- कंगनाच्या अडचणीत वाढ?, न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करणारा अर्ज दाखल

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

1 thousand 597 healthcare workers vaccinated 10 vaccination centers Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 thousand 597 healthcare workers vaccinated 10 vaccination centers Mumbai