कंगनाच्या अडचणीत वाढ?, न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करणारा अर्ज दाखल

सुनीता महामुणकर
Wednesday, 20 January 2021

अभिनेत्री कंगना राणावत विरोधात मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करणारा अर्ज करण्यात आला आहे.

मुंबईः वादग्रस्त ट्विट केल्याच्या आरोपामध्ये फिर्याद दाखल झालेल्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करणारा अर्ज करण्यात आला आहे.

कंगना विरोधात वांद्रे न्यायालयात दिग्दर्शक मुन्नावर अली सय्यद यांनी राष्ष्ट्रद्रोहाचा आरोप करुन फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने वांद्रे पोलिसांना तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. याविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात याचिका केली आहे आणि हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

याचिकेवर काही दिवसांपूर्वी न्यायालयात सुनावणी झाली. कंगना आणि तिच्या बहिणीने चौकशीसाठी हजर रहावे असे निर्देश  न्यायालयाने दिले होते. त्यानुसार  8 तारखेला तिने पोलिसांसमोर हजेरी लावली. मात्र त्याआधी तिने एक व्हिडिओ ट्विट करून चाहत्यांना तपासाबाबत माहिती दिली. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना आणि पोलिसांचा तपास सुरू असताना अशाप्रकारे ट्विट करुन तिने न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान केला आहे असा अर्ज अली यांनी केला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सोमवारी अली यांनी अर्ज केला असून कंगनावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस चौकशीला जाण्याआधी अशाप्रकारे ट्विट करुन कंगनाने न्यायालय निर्देशांचा भंग केला आहे. तसेच पोलिस तपासाची माहितीदेखील अकारण दिली, असा आरोप केला आहे.

कंगनाने मुंबई पोलिस आणि मुंबईवर वादग्रस्त शब्दांत ट्विट करुन मानहानी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच धार्मिक सलोखा विस्कळीत करण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मूळ तक्रारीमध्ये केला आहे. पोलिसांना न्यायालयाने यापूर्वी तपासासाठी अवधी दिला आहे.

हेही वाचा- मुंबईत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा लस टोचून घेण्यास अल्प प्रतिसाद

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Application filed Bombay High Court against Kangana Ranaut contempt court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Application filed Bombay High Court against Kangana Ranaut contempt court