मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर 18 दिवसांमध्ये तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा लोकल प्रवास..   

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर 15 जुन पासून रेल्वेची उपनगरीय सेवा सुरू होती. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

मुंबई: रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर 15 जुन पासून रेल्वेची उपनगरीय सेवा सुरू होती. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली. दरम्यान या 18 दिवसांमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर सुमारे 10 लाख 82 हजार प्रवाशांनी प्रवास केला असून, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लोकल प्रवासामूळे अनेक समस्या सुटल्याचे सांगितले आहे. 

पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 350 लोकलच्या फेऱ्या सुरू आहे. यामध्ये कोवि-19च्या नियमांचे पालन करून अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी दैनंदिन प्रवास करत आहे. या प्रवासातून पश्चिम रेल्वेने 2 जुलै पर्यंत एकूण 1 लाख 51 हजार 140 तिकीट विक्री केली आहे.

हेही वाचा: तरुणांनो इथे मिळेल नोकरी! MMRDA च्या भरतीसाठी 6 जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावा; असं करा अप्लाय..

तर या तिकीट विक्रीतून 108.34 लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. तर या 18 दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवेत सेवा देणाऱ्या 10.82 लाख प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. 

15 जुन आणि त्यानंतर 1 जुलै पासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लोकल सेवेने प्रवासातील अनेक समस्या सुटल्याच्या भावना सुद्धा लोकलने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. 

पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 350 लोकल फेऱ्या सुरू:

पश्चिम रेल्वे मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एकूण 350 लोकल फेऱ्या धावत आहे. यामध्ये विरार ते चर्चगेट दरम्यान अप-डाऊन 161 फेऱ्या, त्याप्रमाणेच नालासोपारा ते चर्चगेट 7,वसई रोड ते चर्चगेट 2, विरार ते बोरीवली 2 , वसई रोड ते बोरीवली 2, चर्चगेट ते बोरीवली अप-डाऊन 134, महालक्ष्मी ते बोरीवली 6 , चर्चगेट ते डाहानू रोड 6 , बोरीवली ते डाहानू रोड 2 , विरार ते डाहानू रोड 28 फेऱ्या धावत आहे.

हेही वाचा: लोकहो शंभर टक्के काळजी घ्यावीच लागेल, कारण कोविड बरोबरच आता याचाही 'मोठा' धोका

अत्यावश्यक सेवेतील प्रवासी संख्येत वाढ:

सुरूवातीला रेल्वे मंत्रालयाने 15 जुन रोजी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली होती. त्यानंतर 1 जुलै पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामूळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासाच्या संख्येत वाढ झाली, त्यामध्ये आयकर, जीएसटी, सीमा शुल्क, डाक विभाग, राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालय आणि राजभवनातील कर्मचाऱ्यांना नव्याने लोकल प्रवासाची परवानगी मिळाली.

10 lac people traveled by local in 18 days 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 lac people traveled by local in 18 days