
मुंबई : लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंची संख्या मागील १५ वर्षांत ४६ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला असला तरी दिवसाला १० प्रवाशांचा मृत्यू होणे ही चिंताजनक बाब आहे. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजना पुरेशा नाहीत हे स्पष्ट होते, असे ताशेरे उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २०) ओढले. तसेच ९ जून रोजी लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली.