एकच नंबर! 101 वर्षीय आजीबाईंचा रुग्णालयात वाढदिवस साजरा; बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून पेरीन इराणीला अनोखी भेट

भाग्यश्री भुवड
Friday, 18 September 2020

101 वर्षीय पेरिन इराणी यांच्यावर  काही दिवसांपूर्वी एक मोठी शस्त्रक्रिया केली आहे. त्यांचा आज 101 वा वाढदिवस डॉक्टरांनी रुग्णालयातच साजरा करुन पेरिन यांना सुखद धक्का दिला आहे

 

मुंबई : 101 वर्षीय पेरिन इराणी यांच्यावर  काही दिवसांपूर्वी एक मोठी शस्त्रक्रिया केली आहे. त्यांचा आज 101 वा वाढदिवस डॉक्टरांनी रुग्णालयातच साजरा करुन पेरिन यांना सुखद धक्का दिला आहे.

आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट, कलम १४४ लागू झाल्यानंतर म्हणालेत घाबरू नका

बॉम्बे रुग्णालयातील डॉ. पराग मुंशी यांनी त्यांच्या हेल्थकेअर स्टाफने इराणी यांच्या साठी फुलांचा गुच्छा, चॉकलेट केक आणून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.  इराणी यांची जगण्याबाबतची इच्छा शक्ती दांडगी आहे. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन आपल्या घरी जातील. त्या सध्या आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

केंद्राची परवानगी असूनही राज्याने शिक्षणासाठी चॅनेल सुरू केले नाही; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

ग्रांटरोडला राहणाऱ्या इराणी या काही दिवसांपुर्वी त्यांच्या राहत्या घरी पडल्या होत्या. ज्यात त्यांच्या कंबरेला दुखापत झाली होती.  6 सप्टेंबरला त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल केले गेले. ग्रांटरोडच्या रहिवासी असलेल्या इराणी या त्यांच्या 86 वर्षीय पुतणीसोबत राहतात.

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 101 year old grandmother celebrates birthday at hospital