

Missing Children Crisis Deepens in Thane; Parents Seek Answers
sakal
-पंकज रोडेकर
Thane Missing Children : घरातून रागाने किंवा अज्ञात कारणाने बाहेर पडलेले आपले मूल परत येईल का, या एकाच विवंचनेत ठाणे शहर परिसरातील १०७ कुटुंबे आज अस्वस्थतेत दिवस काढत आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत १,३०१ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी १,१९४ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अद्याप ८९ मुली आणि १८ मुलांचा शोध लागलेला नाही.