विक्रमगड-पाली मार्गावर एसटी अन् कंटेनरमध्ये भीषण अपघात, 11 जण जखमी

अमोल सांबरे
Thursday, 3 September 2020

जखमींना पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने विक्रमगडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विक्रमगड : विक्रमगड-पाली मार्गावर वाकडुपाडा येथे महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह कंटेनर चालक आणि 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने विक्रमगडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. बस आणि कंटेनरचे यात मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी 6.45 ते 7 च्या दरम्यान झाला. 

हेही वाचाः मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष

एसटी बस विक्रमगड मार्गे प्रवास करत होती तर कंटेनर पाली मार्गे प्रवास करत होता. या दरम्यान हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे हा रस्ता काही काळ बंद होता. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला करुन मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. 

(संपादन : वैभव गाटे)

11 injured in ST and container accident on Vikramgad Pali road 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 injured in ST and container accident on Vikramgad Pali road