मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष

मिलिंद तांबे
Thursday, 3 September 2020

मुंबईत कोरोना रूग्णांच्या एकूण मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू हे रूग्णालयांत दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत झाले.

मुंबई :  कोरोना रूग्णांचा मृत्यूदर कमी कऱण्यासाठी राज्य सकारने मृत्यूदर नियंत्रण समितीची स्थापना केली. समितीने नुकताच आपला तिसरा अहवाल सरकारला सादर केला.  त्यात मृत्यूदर कमी करण्यासाठी रूग्णाला लवकरात लवकर रूग्णालयात दाखल करावे तसेच त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 18 हजाराहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर 7,700 पेक्षा अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू नियंत्रण समितीने त्यातील 5,200 मृत्यूंचा अभ्यास करून हे निष्कर्ष नोंदवले आहेत. 

संजय राऊत मला उघडपणे धमकी देतायत, कंगना राणावतचं नवं ट्विट

मुंबईत कोरोना रूग्णांच्या एकूण मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू हे रूग्णालयांत दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत झाले. तर 59 टक्के मृत्यू रूग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील 4 दिवसांत झाले, अशी धक्कादायक माहिती राज्य मृत्यू नियंत्रण समितीच्या विश्लेषणातून समोर आली आहे.  मुंबईत रूग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, मृतांमध्ये किंचितशी वाढ होत आहे. संसर्गाकडे  होणारे दुर्लक्ष, उपचारास उशीर तसेच आरोग्याबाबतच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

प्लाझ्मादानासाठी महिलाही घेताहेत पुढाकार; अनेक महिलांनी व्यक्त केली प्लाझ्मादानाची इच्छा 

तरीही पूर्वीपेक्षा मृत्यूदर कमी
रूग्णाने कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता तसेच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधणे महत्त्वाचे असल्याचे मृत्यू नियंत्रण समितीचे प्रमुख डॉ. अविनास सुपे यांनी सांगितले. मात्र, मुंबईत सुरूवातीपेक्षा आता मृत्यूदर कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

नवी मुंबईतील मॉलचे पुन्हा उघडले दार; अनलॉक 4 नुसार या अटीचे पालन करावे लागणार 

अनेकदा रूग्ण रूग्णालयात उपचारासाठी उशिरा पोहोचतात. त्यातील अनेकांची तब्येत रूग्णालयात दाखल कऱण्यापूर्वीच खालावलेली असते. त्यामुळे अशा रूग्णांचा रूग्णालयात दाखल करताच मृत्यू होतो.
- डॉ. ओम श्रीवास्तव, सदस्य, राज्य टास्क फोर्स
 

संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the reason behind for mortality rate in mumbai came forward, people need to take precaution