esakal | चिंताजनक ! ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंंख्या 100 पार
sakal

बोलून बातमी शोधा

चिंताजनक ! ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंंख्या 100 पार

ठाणे जिल्ह्यात मंगळवार पाठोपाठ बुधवारी (ता.6) देखील 114 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा शंभरी पार गेला आहे. तर, मृतांचा संख्येत दोनने वाढ झाली आहे.

चिंताजनक ! ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंंख्या 100 पार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवार पाठोपाठ बुधवारी (ता.6) देखील 114 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा शंभरी पार गेला आहे. तर, मृतांचा संख्येत दोनने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 1 हजार 512 इतका झाला असून मृतांचा आकडा 40 वर गेला आहे. मागील तीन ते चार दिवसापासून बाधितांच्या उच्चांकी गाठणाऱ्या आकडेवारीमुळे जिल्ह्याची चिंता अधिक वाढ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजन करण्यात येत आहे. तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने ठाणे व नवी मुंबई पालिका हद्दीत रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

मुंबई हायकोर्ट आलं राज्य राज्य सरकारच्या मदतीला धावून, केलं असं काही... 

बुधवारी ठाणे व नवी मुंबई पालिका क्षेत्रात प्रत्येकी 45 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने तेथील एकूण रुग्णांची आकडेवारी अनुक्रमे 495 व 440 इतकी झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीत 9 बाधितांमुळे तेथील आकडा 233 झाला आहे. तसेच मीरा भाईंदरमध्ये 6 रुग्ण आढळून आल्याने तेथील बाधितांचा आकडा 196  झाला असून दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 7 झाली आहे. तसेच उल्हासनगर पालिकाक्षेत्रात एकाची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 17 वर गेला. तर,  ठाणे ग्रामीण भागात 8 नव्या बाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील बाधितांचा आकडा 58 वर गेला आहे.

 114 new corona patients in one day in Thane district, two Death

loading image
go to top