
पश्चिम रेल्वे मार्गावर येणाऱ्या प्रत्येक लोकलच्या स्वच्छतेसाठी 10 ते 12 लीटर सॅनिटायझरचा वापर केला जात आहे.
मुंबई: कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे लोकलची साफसफाई जोरात सुरु आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर येणाऱ्या प्रत्येक लोकलच्या स्वच्छतेसाठी 10 ते 12 लीटर सॅनिटायझरचा वापर केला जात आहे.
राज्य सरकारने अनुमती दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली. यावेळी 18 लोकलच्या 162 फेऱ्या होत होत्या. त्यानंतर राज्य सरकारने काही क्षेत्रातील प्रवाशांना, ठराविक वेळेत महिलांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता पूर्ण क्षमतेने 81 लोकलच्या 1 हजार 201 फेऱ्या होत आहेत.
अनेक कर्मचारी कोरोना योद्धया म्हणून काम करत आहेत. कोरोना रुग्णांचा उपचार करत आहेत. त्यामुळे लोकलद्वारे कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वेकडून दर फेरीला, कारशेडमध्ये लोकल गेल्यावर लोकलला निर्जंतुकीकरण केले जाते.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल कारशेड, कांदिवली कारशेड, विरार कारशेड येथे रेल्वे कर्मचारी लोकलची स्वच्छता करत आहेत. लोकलचे सॅनिटायझर करण्यासाठी एकूण 31 कर्मचारी आहेत. 12 डब्यांच्या लोकलला 10 ते 12 लिटर सॅनिटायझरचा वापर केला जातो. प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळून प्रवास करावा. फिजिकल डिस्टन्स राखून प्रवास करावा. लोकलच्या प्रत्येक जागेची सफाई, सॅनिटायझर करण्यात येत आहे. यासह लोकलच्या आसनावर 'कृपया येथे बसू नये' असे स्टिकर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी त्या ठिकाणी बसून प्रवास करू नये, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केले आहे.
हेही वाचा- मोफत STनं प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 'ही' बातमी महत्त्वाची
------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
12 liters sanitizer used for cleaning local train western railway line