मोफत STनं प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 'ही' बातमी महत्त्वाची

प्रशांत कांबळे
Thursday, 21 January 2021

अत्यावश्यक सेवेवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची एसटी बस मोफत वाहतूक 16 जानेवारीपासून बंद करण्यात आली आहे.

मुंबई: अत्यावश्यक सेवेवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची एसटी बस मोफत वाहतूक 16 जानेवारीपासून बंद करण्यात आली आहे. तशा सूचना सुद्धा मुंबई, ठाणे, पालघर विभागातील विभाग नियंत्रकांना एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत. 

कोरोनाच्या काळात लोकलची सेवा आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर पोहोचणे कठीण झाले होते. त्यामुळे दरम्यान एसटी महामंडळावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासी सुविधा देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. शिवाय त्यांना मोफत प्रवासी सेवा सुरू केली होती.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र, आता एसटीने ही मोफत प्रवासी सेवा बंद केली आहे. या फेऱ्यांना मिळणाऱ्या प्रवाशी प्रतिसादाचे भारमानाचा आढावा घेऊन योग्य त्या प्रमाणात फेऱ्या चालनात ठेवाव्या अशा सूचना सुद्धा एसटी महामंडळ प्रशासनाने दिल्या आहे.

हेही वाचा- कंगनाच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स जारी 

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Free ST bus service government employees working essential services suspended


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free ST bus service government employees working essential services suspended