
मुंबई महापालिकेनं शहरातील रेल्वेमार्गावरुन जाणारे तब्बल १३ पूल धोकादायक म्हणून जाहीर केलेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
मुंबईः मुंबई महापालिकेनं शहरातील रेल्वेमार्गावरुन जाणारे तब्बल १३ पूल धोकादायक म्हणून जाहीर केलेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. मुंबईमधील मध्य रेल्वेवरील चार, तर पश्चिम रेल्वेवरील नऊ उड्डाणपूल धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
तसंच यंदा गणेश आगमन-विसर्जनाला मिरवणुका काढण्यास बंदी असली तरी या पुलांवर भाविकांनी गर्दी करू नये, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. गणेश आगमन आणि विसर्जनाच्या वेळी उड्डाणपुलांवरून भाविकांची ये-जा सुरू असते. रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या १३ पुलांपैकी काही पुलांची दुरूस्ती कामे सुरू झाली असून काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणारेत. मुंबईमधील नऊ उड्डाणपूल धोकादायक बनले असून काही उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. तर काही पुलांची दुरुस्ती प्रस्तावित आहे.
यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. गणेशभक्तांना आणि गणेश मंडळांना रेल्वेमार्गावरील पुलांच्या संभाव्य धोक्याबाबत मुंबई महापालिकेने सावध केलं आहे. रेल्वेमार्गावरील पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक स्थितीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेने यंदा आगमन-विसर्जनाला मिरवणुका काढण्यास बंदी घातली. तरीही या दोन्ही दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील धोकादायक १३ पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचाः मुंबईकरांनो काळजी घ्या! येत्या बुधवारपर्यंत 'ही' असेल पावसाची स्थिती...ठाणे, पालघरही अलर्टवर
गणेशभक्तांनी पूल पार करताना काळजी घ्यावी. पुलावरून विसर्जनाच्यावेळी जाताना गटागटाने जावे. पुलांवर ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये तसेच नाचगाणी करू नयेत. पुलांवर जास्त वेळ न थांबता त्वरित पुढे जावे. पोलिस आणि महापालिका प्रशासन यांनी दिलेल्या सुचनांनुसार ये-जा ठेवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे. करी रोड आणि चिंचपोकळी रेल्वेपुलांबाबत विशेषत: काळजी घ्यावी, अशी माहिती देण्यात आलीय.
पुलांवर १६ टनपेक्षा जास्त वजन पडणार नाही. पुलावर जास्त काळ थांबून राहू नये, याची गणेशोत्सव मंडळांनी विसर्जनादरम्यान काळजी घ्यावी, असं आवाहन देखील पालिकेनं केलं आहे.
अधिक वाचाः सर्व आजारांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी BMC मेगा प्लॅन; जाणून घ्या काय केल्या जाणार उपाययोजना
मध्य रेल्वे: घाटकोपर उड्डाणपूल, करीरोड उड्डाणपूल, चिंचपोकळी उड्डाणपूल, भायखळा उड्डाणपूल.
पश्चिम रेल्वे: मरिन लाइन्स उड्डाणपूल, सॅण्डहर्स्ट उड्डाणपूल, चर्नीरोड – ग्रॅन्टरोड दरम्यानचा फ्रेंच उड्डाणपूल, केनेड उड्डाणपूल, ग्रॅन्टरोड- मुंबई सेंट्रल दरम्यानचा फॉकलंड उड्डाणपूल, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील बेलासीस उड्डाणपूल, महालक्ष्मी स्टील उड्डाणपूल, प्रभादेवीचा कॅरोल उड्डाणपूल, दादरचा टिळक उड्डाणपूल.
This 13 railway bridges and flayovers dangerous condition mumbai