मुंबईकरांनो काळजी घ्या! येत्या बुधवारपर्यंत 'ही' असेल पावसाची स्थिती...ठाणे, पालघरही अलर्टवर

समीर सुर्वे
Sunday, 16 August 2020

मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून रविवारीही अशीच परीस्थीती राहाणार आहे. पालघर ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी अतिवृष्टीची अंबर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे

मुंबई :मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून रविवारीही अशीच परीस्थीती राहाणार आहे. पालघर ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी अतिवृष्टीची अंबर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही भागात 204 मि.मी पर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता आहे. मुंबईसह महामुंबईत बुधवार पासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. बुधवारपर्यंत रत्नागिरी सिंधूदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्‍यता असून रायगड मध्ये ही परीस्थीती मंगळवार पर्यंत राहाणार आहे.

शाब्बास! या अदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच... अनोख्या पद्धतीने साजरा केला स्वातंत्र्य दिन

मुंबईत शुक्रवारी रात्री पासून जोरदार पाऊस सुरु झाला. शनिवारी दिवसभर पावसाचा रिपरीस सुरु होती. अशीच परीस्थीती बुधवार पर्यंत राहाणार आहे. पुढील दोन दिवस पावसासह ताशी 45 ते 55 किलोमिटर वेगाने वारे वाहाण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे येथे आज सर्वाधिक 71 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला. पवई आयआयटी येथे 65 मि.मी आणि अंधेरी लोखंडवाला परीसरात 62.2 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

कोकण किनारपट्टी पर्यटनाच्या विकासाने बहरणार; स्थानिकांची होणार बेरोजगारीतून मुक्तता

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उद्या जोरदार पाऊस राहाणार आहे.तर,सोमवारी या दोन जिल्ह्यांमधील काही भागात 204 मि.मी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात मंगळवार पर्यंत अतिवृष्टीची शक्‍यता वर्तवत अंबर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर,रत्नागिरी सिधूदुर्ग जिल्ह्यात बुधवार पर्यंत अंतिवृष्टीची शक्‍यता आहे.

The rains will continue in Mumbai, Thane and Palghar districts  also on Amber alert 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rains will continue in Mumbai, Thane and Palghar districts also on Amber alert