मुंबई : मालवणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीचा वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षांच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या पीडित मुलीची अश्लील क्लिप (चित्रफित) तिच्या आईला पाठविण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.