मुंबईतील 150 तबलिगी विरोधात गुन्हा दाखल; माहिती लपवल्याचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 6 एप्रिल 2020

  • मुंबईतील 150 तबलिगी विरोधात गुन्हा दाखल
  • माहिती लपवल्याचा आरोप; महापालिकेची तक्रार
     

मुंबई : दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमला उपस्थित राहून माहिती लपवल्याप्रकरणी 150 व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलिस ठाण्यात भादंवि कलम 188, 269 व 270 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीगी जमात मरकजच्या कार्यक्रमात मुंबईतील 150 व्यक्ती सहभागी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांचा तत्काळ शोध घेऊन अनेकांना वेगळे करण्यात आले; मात्र प्रशासनापासून ही माहिती लपवल्यामुळे मुंबई पोलिसांनी या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या वतीने अग्निशमन दलाचे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार साथीचा रोग पसरवणे, तसेच या कार्याक्रमास उपस्थित राहूनही माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथीचा रोग घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर 11 मार्चपासून राज्यात विविध कार्यक्रमांना प्रतिबंध घालण्यात आले होते. त्यानंतरही आरोपींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून साथ पसरेल असे कृत्य केल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

मुंबईत अनेक ठिकाणी 150 तबलिगीशी संबंधीत व्यक्तींचे विलीगीकरण करण्यात आले आहे. त्यातील  सांताक्रूज येथील बडी मस्जिद येथे 20 जणांचे तर, वांद्रे येथील झरिना सोसायटीमध्ये 12 लोकांचे विलीगीकरण करण्यात आले आहे. वांद्रे येथील 12 लोक इंडोनेशिया मधून आली होती; तर बडी मस्जिद मधील लोक गुजरात, राजस्थानची होती. 30 मार्चला या 32 जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. त्यांना आणखी 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे कामही सुरू आहे.  

150 cases registered against Mumbai Tbiligi |


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 cases registered against Mumbai Tbiligi |