Pm Modi In Thane: मोदींच्या कार्यक्रमाला नवी मुंबईतून १५ हजार महिलांची कुमक,संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले टार्गेट

Thane news: महापालिकेचे समाजविकास विभागाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधीक्षक आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत महापालिका प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे.
Pm Modi In Thane: मोदींच्या कार्यक्रमाला नवी मुंबईतून १५ हजार महिलांची कुमक,संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना  दिले टार्गेट
Updated on

Latest Thane news: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ठाणे येथे पार पडणाऱ्या महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमाला नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला येणार आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतून सुमारे १५ हजार महिलांना आणण्याचे टार्गेट नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे समाजविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत. महिलांना कार्यक्रमाला नेण्यासाठी पालिकेच्या आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका आदी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com