Thane: ठाणे जिल्ह्यासाठी १५ हजार शाईच्या बाटल्या, हक्क बजावणाऱ्या बोटावर शाई

Thane : लोकशाहीचा हा उत्सव साजरा करता असताना कोणत्याही साधन सामग्रीची कमतरता भासू नये,
Updated on

LtestMumbaiNews: विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानेदेखील कंबर कसली आहे. मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या साधन सामग्रीची जुळवाजुळव करण्याची लगबग सुरू झाली आहे.

मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावण्या येत असते. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दोन याप्रमाणे सहा हजार ८९४ मतदान केंद्रांसाठी १५ हजार शाईच्या बाटल्यांची जुळवाजुळाव सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सर्वाधिक ५१८ मतदान केंद्रे ही मुरबाड विधानसभा मतदारसंघात असून त्या ठिकाणी सर्वाधिक एक हजार ३६ शाईच्या बाटल्या लागणार आहेत.

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी १५ हजार शाईच्या बाटल्या,  हक्क बजावणाऱ्या बोटावर शाई
Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com