धोका वाढतोय; नवी मुंबईत मे महिन्यात सापडले 'इतके' रुग्ण 

navi mumbai.
navi mumbai.


तुर्भे : वाढत्या उन्हासोबतच करोनोचा धोका देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये एप्रिल महिन्याच्या तुलनेने मे महिन्यात कोरोना संक्रमन वाढताना दिसत आहे. या महिन्यात तब्बल 1600 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोना झाला आहे.तर मृत्यूचा प्रमाणही वाढले असून एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या 1853 वर पोहचली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने आपल्या कार्यशैलीमध्ये बदल करण्याची गरज भासू लागली आहे. 
मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संक्रमनाचा आलेख धक्कादायक आहे. 1 मे रोजी 20 कोरोनाग्रस्त होते. त्यानंतर दर दिवशी सरासरी 40 पासून 105 रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. 11 मे रोजी तर रेकॉर्ड ब्रेक करत 105 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकिय अहवाल प्राप्त झाले होते

महत्त्वाची बातमी ...म्हणून पालकांचा जूनमध्ये शाळा सुरू करण्यास कडाडून विरोध


.30 एप्रिल रोजी 239 कोरोना बाधितांची संख्या होती.परंतु ती आता 1853 वर पोहचली आहे. त्यामुळे मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण सापडल्याचे स्पष्ट होते आहे. 
महापालिका आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 27 मे रोजी 79 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या 1853 वर पोहचली आहे. आजतागायत रुग्ण बरे होऊन गेलेल्या रुग्णाची संख्या 840 वर पोहचली आहे. सध्या घरी विलगिकरण करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 8753 आहे. तर अलगिकरणाचा कालावाधि पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 19,326 इतकी आहे. तर 30 एप्रिल पर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.

तर सुरू असलेल्या मे महिन्यात 54 जणांचा बळी गेला आहे. तर 900 रुग्णांचे रक्त तपासणी अहवाल येण्याचे बाकी आहेत. 
ज्या नागरिकाला कोरोना आजाराची लक्षणे दिसतात.ते नागरिक कोरोना टेस्ट करण्यासाठी जातात.परंतु टेस्ट रिपोर्ट दहा दिवसापेक्षा जास्त कालावधीत प्राप्त होत असल्याने टेस्ट करणारा रुग्ण कुठेही फिरत असतो.त्यावर बंधन ठेवण्यास कोणताही घटक उपलब्ध नसल्याने कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा आहे. 

आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय.पण नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घेणे गरजेचे आहे.तरच आपण यशस्वी होऊ शकतो. 
संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महानगर पालिका 

 

 

1600 corona affected navi mumbai 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com