पालघरमध्ये वीज पडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाच जण जखमी

पूजा विचारे
Monday, 7 September 2020

आंबिस्ते खुर्द या गावात रविवारी संध्याकाळी सुमारास वीज पडून एका तरूणाचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खानिवली आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. 

मुंबईः पालघरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. रविवारीही विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. मात्र यावेळी एक दुर्देवी घटना घडली आहे. आंबिस्ते खुर्द या गावात रविवारी संध्याकाळी सुमारास वीज पडून एका तरूणाचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खानिवली आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. 

या घटनेत १७ वर्षीय सागर शांताराम दिवा या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर संदीप दिवा, अनंता वाघ, रविंद्र पवार, नितेश दिवा,सनी पवार हे पाच तरूण जखमी झालेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांनंतर 'या' बड्या नेत्यांच्या घरी खणखणले धमकीचे फोन, वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक भागात रविवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. यावेळी आंबिस्ते येथील एका वस्तीवर विज पडून सदरची घटना घडली.  पावसापासून संरक्षणासाठी हे सर्व तरुण एका झाडाखाली जमा झाले होते. यावेळी सागर शांताराम दिवा या तरुणाच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

17 year old boy Sagar Diva passed Away Due Lightning strikes Palghar Rain


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 year old boy Sagar Diva passed Away Due Lightning strikes Palghar Rain