'सेल्फी' बेतली जीवावर, 500 फूट खोल दरीत पडून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू I Murbad Gorakhgad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murbad Gorakhgad

या घटनेनंतर दामिनीच्या मैत्रिणींनी मुरबाड पोलिसांना ही माहिती दिली.

'सेल्फी' बेतली जीवावर, 500 फूट खोल दरीत पडून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

कल्याण : उंचावर, टेकडीवर अथवा डोंगरावर जाऊन सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना सातत्यानं वाढत आहेत. असाच काहीसा प्रकार मुंबईजवळच्या मुरबाडमध्ये घडलाय. गडावर सेल्फी (Mobile Selfie) काढताना तोल जाऊन 500 फूट खोल दरीत पडल्यानं 17 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दामिनी ज्ञानेश्वर दिनकरराव असं या तरुणीचं नाव असून मुरबाडच्या गोरखगडावर (Murbad Gorakhgad) हा प्रकार घडलाय.

दामिनी दिनकरराव (Damini Dinkarrao) ही शहापूर तालुक्यातील (Shahapur Taluka) उंभ्रई गावाची रहिवासी होती. ती बुधवारी (6 एप्रिल) दुपारी काही मित्रांसोबत मुरबाड तालुक्यातील गोरखगडावर गेली होती. त्यावेळी गडावरील एका ठिकाणी ती मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात सेल्फी काढत होती. त्याचवेळी दरीच्या कडेला उभी असताना तोल जाऊन ती गडावरुन थेट दरीत कोसळली.

हेही वाचा: 'विक्रांत'प्रकरणी आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या

या घटनेनंतर दामिनीच्या मैत्रिणींनी मुरबाड पोलिसांना (Murbad Police) ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलिस आणि सह्यागिरी ट्रेकर संस्थेच्या मदतीनं तिचा मृतदेह पाच तासानंतर बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, यात पोलीस आणि अग्निशमन दलानं काहीच मदत केली नसल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. गावकरी आणि इतर लोकांच्या मदतीनं तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दामिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय.

Web Title: 17 Year Old Girl Falls From 500 Feet Cliff While On Trek To Murbad Shahapur Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai News