मुंबईत कोरोनाचं 'अम्फान', आज वाढलेला कोरोना रुग्णांचा आकडा पायाखालची जमीन सरकवणारा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मुंबईतील रुग्णसंख्या 27,068 वर, दिवसभरात 1751 नव्या रुग्णांची भर तर 27 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा 909 वर

मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच सुरु आहे. आजही एकट्या मुंबईत 1751 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून रुग्णांचा आकडा  27,068 वर पोचला आहे. आज 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 909 वर पोचला आहे. आज सापडलेल्या नवीन रुग्णांपैकी 276 रुग्ण गेल्या आठवड्याभरातील आहेत.

आज मुंबईतील विविध परिसरात 1751 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 29,068 झाली आहे. आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 1475 रुग्ण आज सापडले असून 276 रुग्ण आठवड्याभरापूर्वीचे आहेत.

मोठी बातमी - लॉकडाऊन 4.0: मुंबईत आजपासून काय सुरु ...

आज झालेल्या 27 मृत्यूंपैकी 22 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 18 पुरुष तर 9 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी  एकाचे वय 40 च्या खाली आहे. तर 13 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबईतील मृतांचा एकूण आकडा 909 झाला आहे. 

संशयित रुग्णांमध्येही वाढ झाली असून आज एकूण 780 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 23,264 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 329 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 7,080 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

मोठी बातमी - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनो सर्वात मोठी बातमी, BMC म्हणतेय...

एकट्या मुंबईत 900 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत पोलिसांचा आकडा 900 झाला असून  गेल्या 24 तासांत मुंबईत सुमारे दीडशे पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत एक हजार 666 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.मुंबईतील कोरोना बाधीत पोलिसांचा आकडा गुरुवरी 750 होता. शुक्रवारी  त्याता आणखी 150 पोलिसांची भर पडली असून हा आकडा 900 वर पोहोचला आहे. 

1751 new covid 19 positive patients found in mumbai 27 people lost their lives

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1751 new covid 19 positive patients found in mumbai 27 people lost their lives