esakal | लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं उद्योगपतीच्या मुलाला पडलं महागात, थेट जीवावर बेतलं
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं उद्योगपतीच्या मुलाला पडलं महागात, थेट जीवावर बेतलं

भीषण अपघातात उद्योगपतीचा मुलगा ठार 

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं उद्योगपतीच्या मुलाला पडलं महागात, थेट जीवावर बेतलं

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊन असतानाही घराबाहेर पडणं हे उद्योगपतीच्या मुलाला महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे रस्ते हे मोकळे आहेत. याच मोकळ्या रस्त्यावरुन सुसाट गाडी चालवणं प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाच्या जीवावर बेतलं आहे. मरीन ड्राईव्ह भागात भरधाव गाडी चालवताना त्याच्या गाडीची धडक पुढे चालत असलेल्या बसला बसली आणि या धडकेत या उद्योगपतीचा मुलगा जागीच ठार झाला. त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मंगळवारी संध्याकाळी कार चौपाटीकडे जात असताना मरीन ड्राईव्ह उड्डाणपुलापासून सुमारे 100 मीटर अंतरावर हा अपघात झाला. या कारमध्ये एकूण तिघे जण होते. लॉकडाऊनमुळे बाहेर रस्ता मोकळा आहे. मरीन ड्राईव्ह परिसराजवळ समुद्र किनारा असल्यानं रस्ता लांबच्या लांब मोकळा असतो. तिथेच आल्यावर त्यांना रस्ता पूर्णपणे मोकळा दिसला. यात कारचालक मित्रानं गाडीचा वेग वाढवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि पुढे जात असलेल्या बसला त्यांच्या गाडीची धडक बसली. 

थैमान ! मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 15 हजाराच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजची रुग्णसंख्या

यात प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा आर्यमन नागपाल याचा मृत्यू झाला आहे. आर्यमन हा 18 वर्षांचा होता. तो नेपियन्सी रोड येथे राहायला होता. या कारमध्ये आर्यमनसोबत त्यांचे मित्र शौर्य सिंह जैन आणि वेदांत पटोदिया हे सुद्धा होते. तर या दोन्ही मित्र जखमी झालेत. कार चालवणारा त्याचा 19 वर्षीय मित्र शौर्यसिंग जैन हा कफ परेडला राहतो.

या भीषण अपघातानंतर पोलिसांनी या तिघांना तात्काळ हरी किशनदास हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच आर्यमनचा मृत्यू झाला होता. तर दोन्ही मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त कार शौर्यसिंग जैनच्या मामाची होती. आर्यमन हा प्रसिद्ध उद्योगपती राजेश नागपाल यांचा मुलगा आहे.

राज्यात कहर ! 24 तासात 1026 नवे कोरोनाबाधित, तर एका दिवसात सर्वाधिक बळी

दरम्यान या अपघाताप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी भरधाव आणि निष्काळजीपणाने वाहन चालवणं गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस अधिक तपास करत आहेत.

loading image
go to top