esakal | राज्यात कहर ! 24 तासात 1026 नवे कोरोनाबाधित, तर एका दिवसात सर्वाधिक बळी
sakal

बोलून बातमी शोधा

corona

339 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 5125 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात कहर ! 24 तासात 1026 नवे कोरोनाबाधित, तर एका दिवसात सर्वाधिक बळी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, एका दिवसात सर्वाधिक 53 जणांचा बळी गेला. त्यामुळे मृतांची संख्या 921 झाली आहे. राज्यात कोव्हिड-19 विषाणूच्या 1026 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 24,427 झाली आहे. आणखी 339 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 5125 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्वाची बातमी : आजपासून सुरु झालेल्या स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक खास तुमच्यासाठी..

मुंबईतील 28,  पुण्यातील 6, पनवेलमधील 6, जळगावमधीळ 5, सोलापूर शहरातील 3, ठाण्यातील 2 आणि रायगड, औरंगाबाद शहर व अकोला शहरातील प्रत्येकी एक अशा एकूण 53 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 29 पुरुष आणि 24 महिला आहेत. मृतांपैकी 21 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 27 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि 5 रुग्ण 40 वर्षांखालील होते. या 53 रुग्णांपैकी 35 जणांना (66  टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या 921 वर गेली आहे. 

मोठी बातमी : सामनातून सरकारला थेट 'हा' सवाल, जनतेचा धीर सुटणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला

  • थ्रोट स्वॅब तपासणी : 2,21,645
  • निगेटिव्ह : 1,95,804
  • पॉझिटिव्ह : 24,427 
  • क्लस्टर कंटेनमेंट झोन : 1289 
  • सर्वेक्षण पथके : 12,923
  • लोकसंख्येची पाहणी : 54.92 लाख 
  • एकूण कोरोनामुक्त : 5125
  • होम क्वारंटाईन : 2,81,655
  • संस्थात्मक क्वारंटाईन : 15,627

53 deaths in one day, in the state Record of 1026 new corona patients

loading image