आई पॉझिटिव्ह पण बाळ निगेटीव्ह, नायर रुग्णालयात 196 बालकांची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जन्म घेतलेल्या तब्बल 196 नवजात बालकांनी आई कोरोना पॉझिटिव्ह असुन ही कोरोनावर मात केली आहे. 

मुंबई - पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जन्म घेतलेल्या तब्बल 196 नवजात बालकांनी आई कोरोना पॉझिटिव्ह असुन ही कोरोनावर मात केली आहे. 

नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 192 कोरोना पॉझिटिव्ह मातांनी 196 बाळांना जन्म दिला. या मातांनी जन्म दिलेल्या बाळांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापैकी 138 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ही रुग्णालयातून देण्यात आली आहे. 

14 एप्रिलपासून आतापर्यंत एकूण 325 कोरोना पॉझिटिव्ह माता नायर रुग्णालयात वेगवेगळ्या कारणांनी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी काहींची प्रसूती झाली असुन काही उपचार घेत आहेत. 

मोठी बातमी -  पॅरासिटामॉल गोळीसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय.... 

192 मातांनी बाळांना जन्म दिल्यानंतर या बाळांची कोरोना चाचणी केली गेली. मात्र, या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असुन ही एक दिलासादायक बाब नायर रुग्णालयाच्या बालरोगतद्य डॉ. सुषमा मलिक यांनी दिली आहे. 

आतापर्यंत वयोवृद्ध, गर्भवती महिला , दिर्ग आजार असणार्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नायर रुग्णालयात जन्म घेतलेली बालके कोरोना निगेटीव्ह आल्याने डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

मोठी बातमी - लॉकडाऊनमध्ये केलं 'असं' काही आणि अबु आझमी यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा...

192 मातांनी 196 बाळांना जन्म दिला. त्यात दोन जुळी आणि एक तीळी बालके जन्माला आली. त्यांची सर्वांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात ती बालके कोरोना निगेटीव्ह आली. मात्र, त्या बाळांना हाताळल्यानंतर 6 ते 7 बालकांना संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार केले गेले. आणि ती सर्व बालके डिस्चार्ज देण्याआधी निगेटीव्ह आली आहेत. मातेने बाळाला हाताळताना विशेष काळजी घेतली पाहिजे. बाळ आधी निगेटीव्ह आले तरी ते हाताळण्यातून पॉझिटिव्ह येऊ शकते. गर्भात किंवा दुध प्यायल्यानंतर बाळाला संसर्ग होत नाही. - डॉ. सुषमा मलिक, बालरोगतद्य, नायर रुग्णालय

संपुर्ण खबरदारी आणि काळजी घेऊनच या मातांची प्रसूती केली गेली आहे. जन्माला आलेल्या बाळांपैकी एकूण 138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह मातेची प्रसूती करणं हे खुप कठीण कार्य असतं. ज्यात सर्वाधिक यश हे निवासी डॉक्टरांचे आहे. - डॉ. नीरज महाजन, नोडल ऑफिसर इंचार्ज, नायर रुग्णालय प्रसूती विभाग

196 new born babies detected corona negative in nair hospital of mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 196 new born babies detected corona negative in nair hospital of mumbai