Sat, April 1, 2023

Thane News : बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला; दोघांचा मृत्यू, एक जखमी
Published on : 24 February 2023, 2:04 am
ठाणे : ठाण्याच्या नौपाडा परिसरात इमारतीच्या पायाभरणीदरम्यान मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असताना माती खचल्याने ढिगाऱ्यात अडकल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर एक जण जखमी झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नौपाडा येथील बी-केबिन परिसरात एका इमारतीच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू होते. या वेळी ही दुर्दैवी घटना घडली. रात्री आठ वाजेच्या सुमारास मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने तीन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. या पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.