दोन वर्षानंतर डोंबिवलीत रंगतोय दहीहंडीचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dahihandi

दोन वर्षानंतर डोंबिवलीत रंगतोय दहीहंडीचा थरार

डोंबिवली : दोन वर्षानंतर दहीहंडीचा थरार डोंबिवलीकर अनुभवत आहेत. सर्व पक्षांच्या वतीने डोंबिवलीत ठीकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 नंतर विविध पथके दहीहंडीला सलामी देण्यासाठी येऊ लागली आहेत. पावसाने उगडीप दिल्याने कडकडीत ऊन पडले आहे. यामुळे पावसाच्या पाण्यात नाही घामाच्या धारांत गोविंदा न्हाऊन निघाले आहेत. काही ठिकाणी पाण्याचे शॉवर गोविंदाना भिजवण्यासाठी ठेवण्यात आले आहे.

हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर...असे म्हणत गोविंदा थर रचत आहे. 6 ते 7 थरांची सलामी आतापर्यंत अनेक गोविंदा पथकांनी देऊन आपला सहभाग नोंदविल्याचे पहायला मिळत आहे. डोंबिवली पूर्वेतील माजी नगरसेवक राजेश मोरे व भारती मोरे यांच्या वतीने शिवमंदिर रोडवर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लकी ड्रॉ मधून आकर्षक बक्षिसे, वेशभूषा करून येणाऱ्या बाल गोपालांसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेला माजी नगरसेवक शैलेश धात्रक व मनिषा धात्रक यांनी 22 हजार 222 रुपयांच्या हंडीचे आयोजन केले आहे. दुपारी 2 पर्यंत 8 गोविंदा पथके येथे सलामी देऊन गेले आहेत. तसेच शिंदे गट समर्थक माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या फाउंडेशनच्या वतीने स्वराज्य 2022 या दहीहंडी उत्सवाचे यंदा प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आल्याने गोविंदा पथकांचा कल त्याकडे जास्त दिसून येत आहे. येथे दुपार नंतर अनेक कलाकार आपली उपस्थिती लावणार असल्याने नागरिक त्यांची आतुरतेने वाट पहात असल्याचे दिसून येते.

दोन वर्षानंतर प्रथमच मोठ्या स्वरूपात दहीहंडी उत्सव शहरात साजरा होत असल्याने सगळीकडे जल्लोष पहायला मिळत आहे. रस्त्यावर गोविंदांची मांदियाळी दिसून येत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हंडीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलीस तैनात असून वाहन चालकांना सूचना करत आहेत. गोविंदा दुचाकीवर भोंगे वाजवत शहरात फिरत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत असला तरी यावेळी त्यांना कोणी अडविताना दिसून येत नाही.

Web Title: 2 Year After Dahihandi Festival Dombiwali Celebratoin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..