मुंबई विमानतळावर 20 कोटींची कोंकेन जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whisky Bottle

मुंबई विमानतळावर गुप्तचर महसूल संचालनालय म्हणजेच डीआरआय मुंबई युनिटने कारवाई करत 250 ग्रॅम कोकेन जप्त केली असून एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे.

Cocaine Seized : मुंबई विमानतळावर 20 कोटींची कोंकेन जप्त

मुंबई - मुंबई विमानतळावर गुप्तचर महसूल संचालनालय म्हणजेच डीआरआय मुंबई युनिटने कारवाई करत 250 ग्रॅम कोकेन जप्त केली असून, एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 20 कोटी एवढी किंमत आहे. या प्रकरणी कोकेन तस्करीचा अनोखा फंडा तस्करांनी अवलंबला आहे. या वेळेस तस्करांनी व्हिस्कीच्या बाटल्यामधून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला.

लागोसहुन एडीस अबाबा मार्गे मुंबईत हे अमली पदार्थ आणण्यात आले होतें. या संदर्भात डीआरआयला गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली होती. तपास यंत्रणेने सापळा रचून आदिस अबाबा येथून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली. तपासाअंती व्हिस्कीच्या 2 बॉटल डीआरआय अधिकाऱ्यांनी जप्त केल्या.

या बाटल्यांमध्ये द्रव्य स्वरूपात कोकेन मिसळल्याचं तपासणीत उघड झाले. बाटलीत एकूण 250 ग्रॅम कोकेन असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत 20 कोटी रुपये ताब्यात घेतलं. या प्रकरणात तपास यंत्रणांकडून अटक आरोपीची चौकशी करण्यात येत असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :policecrimeMumbaiDrugs