पॉलिटेक्निक प्रवेशात 20 टक्के वाढ; ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रमाचा फायदा

पॉलिटेक्निक प्रवेशात 20 टक्के वाढ; ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रमाचा फायदा

मुंबई  : कोरोनाचा फटका यंदा प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. अकरावी आणि आयटीआय प्रवेशामध्ये कमालीची घट झाली असताना इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मात्र 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश 100 टक्के पूर्ण झाले आहेत. 

तंत्र शिक्षण संचालनालयाअंतर्गत पार पडणाऱ्या इंजिअनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदा या प्रवेशात कमालीची वाढ दिसून आली. यंदा तंत्र संचलनालयातर्फे विद्यार्थ्यांना या पदविका अभ्यासक्रमाबाबत माहिती मिळावी या उद्देशाने ‘स्कूल कनेक्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. याचा परिणाम म्हणून यंदा इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश 60 टक्के इतके झाले आहेत. 2018 मध्ये हे प्रवेश 41 टक्के इतकेच झाले होते. तर बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदा 100 टक्के झाले आहेत. 

इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम नेमका काय आहे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही शाळांपर्यंत पोहचून विशेष उपक्रम हाती घेतल्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले. या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यापर्यंत तंत्रनिकेतनांची माहिती पोहचवली. शिक्षकांना यामध्ये नेमक्या काय सुविधा आहेत याचीही माहिती करून दिली. विद्यार्थ्यांना आभासी टूर घडविल्याचेही मे म्हणाले. या विशेष उपक्रमात राज्यातील सर्व तंत्रनिकेतनांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली. तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि विभागाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनीही विशेष मार्गदर्शन केल्याचे डॉ. वाघ म्हणाले. यामुळेच प्रवेश वाढले. येत्या काळात तंत्र निकेतन अधिक सक्षम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. 

20 percent increase in polytechnic admissions; Benefit of School Connect initiative

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com