BMC : पालिका कर्मचाऱ्यांना २० हजार बोनस!

दिवाळी गोड; लाखभर कर्मचाऱ्यांना लाभ
20 thousand bonus to mumbai municipal employees for diwali festival mumbai
20 thousand bonus to mumbai municipal employees for diwali festival mumbaisakal

मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळीही गोड होणार आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार कर्मचाऱ्‍यांना यावर्षी दसऱ्याआधीच बोनस मिळण्याची शक्यता असून, पालिकेच्या सुमारे एक लाख दोन हजार कर्मचाऱ्‍यांना याचा लाभ मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी पालिका कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने केली होती; परंतु झालेल्या बैठकीत आयुक्तांनी गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही २० हजार रुपये बोनस दिला जाईल, असे आश्वासन दिल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा समन्वय समितीचे बाबा कदम यांनी सांगितले. 

पालिका कर्मचाऱ्‍यांना २०२० मध्ये १५ हजार ५०० रुपये बोनस मिळाला होता. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने साडेचार हजारांच्या वाढीसह २० हजारांचा बोनस मिळाला होता. या वेळी सलग तीन वर्षे किमान २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णयही झाला होता. त्यानुसार यंदाही २० हजार बोनस देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. जोखमीचे काम करणाऱ्या ४५० टीबी नियंत्रण कर्मचाऱ्यांनाही यावर्षी पालिकेने बोनस द्यावा, अशी मागणी बाबा कदम, चिटणीस संजय वाघ यांनी केली आहे.

सिडकोकडून ४८ हजारांचा बोनस : सिडको महामंडळातर्फे यंदा कर्मचाऱ्यांना ४८ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी ६० हजार रुपये बोनस देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु मंडळाने ही मागणी धुडकावून लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com