ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत 234 नवे रुग्णांची नोंद

covid
covid

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून शुक्रवारी (ता.15) तर तब्बल 234 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आतापर्यंतची उच्चांकी नोंद आहे. तसेत सर्वाधिक 13 जणांच्या मृत्यूची देखील नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 3 हजार 139 झाली असून मृतांची संख्या 100 झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील 4-5 दिवसांपासून बाधीतांच्या आकडेवारीत चढ उतार होत असल्याचे दिसून आले. शुक्रवारी मात्र, जिल्ह्यातील बाधितांबरोबरच मृतांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात उच्चांकी नोंद झाली. यामुळे प्रशासनासह आरोग्य विभाग देखील अधिक सतर्क झाला असून कोरोना रुग्ण आढळलेला परिसरामध्ये लॉकडाऊन कडक करण्यात येत आहे.

शुक्रवारी ठाणे महापालिकाक्षेत्रात 83 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली असून 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 996 वर पोहोचला असून मृतांचा आकडा 48 झाला आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात 74 बाधितांच्या नोंदीसह 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 1 हजार 48 इतका झाला असून मृतांचा आकडा 23 वर गेला आहे. तर,  कल्याण डोंबिवलीत 33 रुगांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 424 इतका झाला असून  मृतांचा आकडा 9 झाला आहे. तसेच उल्हानगरमध्ये देखील 13 नव्या रुग्णांची तर,  एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 94 झाला असून  मृतांचा आकडा 5 झाला आहे. 

तसेच मिरा-भाईंदरमध्ये 5 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 291 इतका झाला असून मृतांचा आकडा 8 झाला आहे. भिवंडी पालिका क्षेत्रात 5 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 38 झाला आहे. बदलापूरमध्ये 4 रुग्णांची करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा 79 झाला आहे. तसेच अंबरनाथमध्ये 9 नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 32 वर गेला. तर,  ठाणे ग्रामीण भागात 8 नव्या बाधितांमुळे एकूण संख्या 137 झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com