मुंबईतल्या इमारतीत कोविडचा फास घट्ट, 24 तासात नव्या 177 इमारतींमध्ये रुग्ण

मुंबईतल्या इमारतीत कोविडचा फास घट्ट, 24 तासात नव्या 177 इमारतींमध्ये रुग्ण

मुंबई: इमारतीत कोविडचा फास आवळू लागला आहे. 24 तासात तब्बल 177 नव्या इमारतींमध्ये नवे कोविड रुग्ण आढळले आहेत. तर सील इमारतींची संख्या तब्बल 16 ने वाढली आहे. एम पश्‍चिम चेंबूर या ठिकाणी तब्बल 21 इमारतींमध्ये पाच पेक्षा अधिक रुग्ण असल्याने या इमारती पूर्ण पणे सिल करण्यात आल्या आहेत. अंधेरी,जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम प्रभागातील सर्वाधिक 450 मजले सील करण्यात आले आहेत. इमारतींमधील सहा लाख रहिवाशी सध्या कोविडच्या बंधनात जगत आहेत.

महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिध्द केलेल्या आकडेवारी नुसार मंगळवारी 161 इमारती पूर्णपणे सील करण्यात आल्या होत्या. 2193 मजले सील करण्यात आले आहे. एकाच इमारतीत पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती संपूर्ण इमारत सील केली जाते. कमी रुग्ण असल्याने ज्या मजल्यावर रुग्ण आहेत ते मजले सील केले जातात. इमारतींमधील तब्बल सहा लाख रहिवाशी सध्या कोविडच्या बंधनात आहेत. 

सोमवारी(ता.1)च्या आकडेवारी नुसार इमारतींमधील 2016 मजले सील होते. 145 इमारती पूर्णपणे सील करण्यात आल्या होत्या. सोमवारी सात प्रभागातील इमारतींमधील 100 हून अधिक मजले सील होते. मंगळवारी ही संख्या आठपर्यंत वाढली आहे. सोमवारी 5 लाख 59 हजार रहिवाशांवर कोविडची बंधने होती. एका दिवसातही संख्या 5 लाख 99 हजारपर्यंत पोहचली आहे.

मुंबईत फक्त 11 वस्त्या,चाळींमध्ये सोमवारी कोविडचे रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित होत्या. यात भांडूप, विक्रोळी एस प्रभागात सहा, कुर्ला एल प्रभागात दोन, एच पूर्व वांद्रे, सांताक्रुझ पूर्व दोन आणि एफ दक्षिण लालबाग परळ या भागातील एक प्रतिबंधित क्षेत्र होते. उर्वरीत 20 प्रभागांमधील वस्त्या आणि चाळींमध्ये एकही रुग्ण नव्हता. मंगळवारी प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये पाचने वाढ झाली.

16 वस्त्या, चाळींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने ते सील करण्यात आल्या आहेत. एस प्रभागात सात, एल प्रभागात 4, एच पूर्व प्रभागात 2 वस्त्या मंगळवारी प्रतिबंधित करण्यात आल्या. एफ दक्षिणमध्ये वाढ झालेली नसून एकच प्रतिबंधित क्षेत्र आहे. ई भायखळा माझगाव या भागात एक आणि कुलाबा, फोर्ट ए प्रभागात 1 प्रतिबंधित क्षेत्र आहे.

हेही वाचा- मुंबईची 'धूळ'धाण, भर रस्त्यावर होतंय विषारी पदार्थांचे उत्सर्जन

100 पेक्षा जास्त मजले सील असलेले प्रभाग

के पश्‍चिम (अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम )- 450
आर मध्य (बोरीवली )- 298
पी उत्तर (मालाड )- 183
डी (ग्रॅन्टरोड मलबारहिल )- 174
आर दक्षिण (कांदिवली )- 166
के पूर्व (अंधेरी जोगेश्‍वरी पूर्व )- 158
एम पश्‍चिम (चेंबूर)-153
टी (मुलूंड)- 126

 
सील इमारती

एम पूर्व -21
के पश्‍चिम - 21
एस - 18
एफ दक्षिण -13
एच पश्‍चिम - 12 

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

In 24 hours new covid patients have been found in 177 new buildings

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com