ठाण्यात कहर ! दिवसभरात दोनशे पेक्षा जास्त कोरोनाबाधित, एकूण बाधितांचा आकडा चार हजाराच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रात बाधितांच्या आकडेवारीत सोमवरी देखील वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यात सोमवारी दिवसभरात 244 रुग्णांसह 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रात बाधितांच्या आकडेवारीत सोमवरी देखील वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यात सोमवारी दिवसभरात 244 रुग्णांसह 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा चार हजाराच्या उंबरठ्यावर जावून पोहोचला आहे. तर मृतांचा आकड्यात देखील भर पडत आहे. त्यात जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार 928 झाला तर, मृतांचा 121 वर पोहोचला आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 

महत्वाची बातमी : सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

ठाणे महापालिकाक्षेत्रात सर्वाधिक 91 कोरोना बाधीतांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा एक हजार 269 वर पोहोचला. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 74 बाधितांच्या नोंदीसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा एक हजार 264 इतका झाला असून मृतांचा आकडा 37 वर गेला आहे. तर, कल्याण डोंबिवलीत 30 रुगिणांची नोंद करण्यात आली असून बाधितांचा आकडा 530 इतका झाला. उल्हानगरमध्ये सात रुग्णांची नोंद करण्यात आली असून बाधितांचा आकडा 126 झाला. तसेच मीरा भाईंदरमध्ये 29 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 359 झाला असून मृतांचा आकडा 11 झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात एका नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 43 झाला आहे. बदलापूरमध्ये दोन रुग्णांची करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा 116 झाला. तसेच अंबरनाथमध्ये दोन नवी रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 36 वर गेला.

Big News - क्या बात हैं ! प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी, नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

उपाययोजना आखण्यास सुरुवात
ठाणे ग्रामीण भागात आठ नव्या बाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 185 वर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार 928 वर गेला असून मृतांचा आकडा 121 इतका झाला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्याकडून विविध उपाययोजन आखण्यात येत आहे. तसेच नागरिकांना घरी राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन करण्यात येत आहे.

244 new patients in Thane in a day 7 killed, read detail story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 244 new patients in Thane in a day 7 killed, read detail story